नमस्कार मी सचिन गायकवाड शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वेबसाईटवर आपले हार्दिक स्वागत..! .......आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद... नवीन माहितीसाठी ब्लॉगवर जरुर अपडेट रहा..! -.

Sunday 23 April 2023

शाळा पूर्व तयारी अभियान २०२३

 शाळा पूर्व तयारी अभियान २०२३

महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक सत्र 2023 24 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या बालकांची शाळा पूर्वतयारी झालेली असते, त्या बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादनूक चांगली दिसून येते. त्या दृष्टीने इयत्ता पहिली ला दाखल पात्र बालकांची शाळा पूर्वतयारी व्हावी व त्यांचे शाळेच्या पहिल्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे याकरिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे. शाळा स्तरावर शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक एक माहे एप्रिल 2023 आणि मेळावा क्रमांक दोन माहे जून 2023 मध्ये आयोजित करावयाचा आहे. दोन्ही मेळाव्या दरम्यान सहा ते आठ आठवडे बालकांची शाळा पूर्वतयारी पालक करून घेणार आहेत. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयसेवक यांची मदत घ्यावयाची आहे.

     या अंतर्गत राज्यस्तरीय प्रशिक्षण दिनांक पाच ते सहा एप्रिल 2023 या कालावधीत एससीईआरटी पुणे येथे होणार असून त्यानंतर जिल्हा, तालुका, केंद्र व शाळा स्तरावर या अभियानाची अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रात करावयाची आहे.


 मेळावा नियोजन—


  1.  जिल्हास्तर प्रशिक्षण या कार्यालयामार्फत प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातून +  मनपातून दोन व्यक्तींची निवड करण्यात यावी. तालुक्यामध्ये या विषयाची जबाबदारी असलेले विषय साधन व्यक्ती यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात यावी. जिल्हास्तर प्रशिक्षणासाठी समन्वयक विषय साधन व्यक्ती एक तसेच शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका यामधून कोणतेही एक असे एकूण दोन व्यक्ती सहभागी होतील. या प्रशिक्षणासाठी आपल्या स्तरावर सदर दोन प्रशिक्षणार्थींची निवड करावी व ती नावे दिनांक 6 एप्रिल पर्यंत या कार्यालयास कळविण्यात यावीत. तसेच आपल्या स्तरावरून संबंधितांना प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यात यावे.

  2. तालुकास्तरीय प्रशिक्षण तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने करावे.. एक दिवसीय वेळापत्रकाप्रमाणे तालुकास्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक किंवा सुलभक म्हणून काम करतील. तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रत्येक केंद्र मधून दोन व्यक्ती केंद्रप्रमुख एक, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्याध्यापक यामधून एक यांची आपल्या स्तरावर प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करावी. तालुकास्तरीय प्रशिक्षण दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात यावे..

  3.  केंद्रस्तरीय प्रशिक्षण प्रत्येक केंद्रामध्ये दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी अर्धवेळ शाळा भरून सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये नियोजनाप्रमाणे केंद्रस्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. तालुकास्तर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे केंद्रस्तर प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम  करतील. केंद्रातील सर्व जीप, न प, मनपा शाळांचे शिक्षक इयत्ता पहिली ते पाचवी व मुख्याध्यापक तसेच केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका यांना केंद्रस्तरीय प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात यावे.

  4.  प्रशिक्षणासाठी व उपक्रम अंमलबजावणीसाठी या विषयाची जबाबदारी तालुक्यामधील एका विशेष साधन व्यक्तीवर समन्वयक म्हणून देण्यात यावी. त्यांचे नाव या कार्यालयात दोन दिवसात कळविण्यात यावे. सर्व स्तरीय प्रशिक्षण उपस्थिती प्रशिक्षण अभिलेखे, खर्चाचे प्रशिक्षण अहवाल, छायाचित्रे मूळ प्रतिसह प्रशिक्षणानंतर आठ दिवसात प्रशिक्षण समन्वयक यांचे मार्फत आपल्या स्वाक्षरीसह या कार्यालयात सादर करण्यात यावे.

  5.  संदर्भ क्रमांक दोन अन्वये माननीय संचालक एस सी आर टी पुणे यांच्याकडून सन 2023 24 मध्ये प्रस्तावित केलेले स्टार्स निधी प्राप्त झाल्यानंतर तालुका व केंद्र स्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषाप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित वेंडर यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत वर्ग करण्यात येईल.


     मार्गदर्शक सूचना :- 


    1.  जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन शिक्षण अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी आयसीडीएस विभाग यांच्या समन्वयाने करावे. मिळावे आयोजन करणे बाबतचे नियोजन पर्यवेक्षीय अधिकारी व शाळांना कळवावे.

    2.  दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे चार तासांचा असावा.

    3.  शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

    4.  मेळाव्यामध्ये इयत्ता पहिली ला दाखल पात्र सर्व बालके व त्यांचे बालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक किंवा दोन दिवस मिळाल्याबाबत वस्ती गाव स्तरावर प्रभात फेरी किंवा दवंडी देऊन समाज माध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.

    5.  उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये सात स्टॉल्स लावले जावेत सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदविकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात.


  6. प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडिओ (2 किंवा ३ मिनिटांचे )  फोटो इत्यादी माहिती समाज संपर्क माध्यमावर ( फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी)  #SHALAPURVTAYARI2023 या HASHTAG चा वापर करून अपलोड करावेत. समाज संपर्क माध्यमातून स्थळाचे नाव व तालुका व जिल्हा नमूद करावा. स्टॉल्स खालील प्रमाणे ➖


    1.  नोंदणी (  रजिस्ट्रेशन )

    2.  शारीरिक विकास

    3.  बौद्धिक विकास

    4.  सामाजिक व भावनात्मक विकास

    5.  भाषा विकास

    6.  गणन पूर्वतयारी

    7.  पालकांना मार्गदर्शन

    शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक व दोन चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक व दोन चे नियोजन करावे व आवश्यक सूचना द्याव्यात.


    7.  केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन करावे. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका वसई सेवक यांची बैठक घेऊन शाळा स्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

  7. प्रत्येक शाळेमध्ये मेळाव्याच्या दिवशी बॅनर व पोस्टर तयार करून लावण्यासाठी रुपये तीनशे प्रमाणे प्रतिष्ठा रक्कम मान्य असून शिक्षणाधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे बॅनर व पोस्टर यांची तालुकास्तरावर विहित कार्यपद्धतीचा वापर करून एकत्रित छपाई करावी व शाळांना मेळाव्यापूर्वी वितरित करण्यात यावी. संदर्भ क्रमांक दोन अन्वये माननीय संचालक एस सी आर टी पुणे यांच्याकडून सन 2023 24 मध्ये प्रस्तावित केलेले स्टार्स निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित वेंडर यांना वर्ग करण्यात येईल. अतिरिक्त खर्च मंजूर केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. बॅनर साइज पाच गुणिले तीन फोटो याप्रमाणे व पोस्टर साईज 2.5 गुणिले दोन फुटी याप्रमाणे प्रिंटिंग करण्यात यावी. सोबत बॅनर व पोस्ट नमुना जोडला आहे.

  8.  मेळावा संदर्भातील फोटो, व्हिडिओ या हॅशटॅग चा उपयोग करावा. http://facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

  9.  शाळा स्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांकेतिक माहिती आपणास जिल्हास्तरावून देण्यात येणाऱ्या गुगल लिंक वर वेळोवेळी भरण्यात यावी.

  10.  दोन्ही मेळाव्यामधील दरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिली दाखल पात्र असलेल्या बालकांचे पालक किंवा माता यांनी शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा व साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शन नुसार घरी शाळा पूर्वतयारीच्या कृती करून घ्याव्यात.

  11.  शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक व दोनचे आयोजन सुव्यवस्थेत रित्या व्हावे याकरिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य सण नियंत्रण कराय व मेळाव्यास भेटी द्याव्यात.

  12.  शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे तसेच शाळा पूर्वतयारी मेळाव्यांचा योग्य प्रचार प्रसार करण्यात यावा.

  13.  शाळा पूर्वतयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळा पूर्वतयारीची जोडणी पुढील शैक्षणिक क्षेत्रात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाची किंवा विद्या प्रवेश मोडेल शी करावी.


  14.  वरील प्रमाणे सर्व शाळांनी आपापल्या शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा एक व दोन साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे. ते आपण क्लिक हेअर या बटणावर क्लिक करून डाऊनलोड करू शकता. 




     





अ क्र

तपशील

लिंक

1

शाळा पूर्व तयारी शासनपरिपत्रक

 Click Here

2

शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजन स्टेप्स

Click Here

3

शाळा पूर्व तयारी मेळावा banner

Click Here

4

शाळा पूर्व तयारी मेळावा पोस्टर्स

Click Here

5

शाळापूर्व तयारी – शाळेतील पहिले पाउल पुस्तिका

Click Here

6

शाळापूर्व तयारी – बालकांसाठी वर्कशीट

Click Here

7

शाळापूर्व तयारी विकास पत्र ( मूल्यमापन शीट )

Click Here

8

शाळापूर्व तयारी पालकांसाठी आयडीया कार्ड

Click Here

9

शाळापूर्व तयारी स्वंयसेवक सहभागी प्रमाणपत्र

Click Here

10

शाळापूर्व तयारी घोषवाक्ये

Click Here

No comments:

Post a Comment