नमस्कार मी सचिन गायकवाड शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वेबसाईटवर आपले हार्दिक स्वागत..! .......आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद... नवीन माहितीसाठी ब्लॉगवर जरुर अपडेट रहा..! -.

गुगल फॉर्म तयार करणे.


गुगल फॉर्म कसा तयार करावा यासाठी खालील लिंक ला टच करावे.



येथे click करा व डाऊनलोड करा



गुगल फॉर्म तयार करणे
   सध्याच्या युगात एखाद्या माहितीचे संकलन करण्यासाठी गुगल फॉर्मचा फार उपयोग होतो. त्यामुळे माहिती जलदररत्या जमा होवून त्याचे संकलनिी सिजररत्या होईल.
यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या माहितीसाठीचा गुगल फॉर्म तयार करता आला पाहिजे. आज आपण याहठकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करायचा आहे हे शिकणार आहोत.
1. गुगल फॉर्म तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपले G-mail ला खाते असले पाहिजे.
2. युजर आय डी व पासवर्ड च्या मदतीने G- mail खाते Login करावे.



Gmail अकाउंट उघडल्यानंतर लाल बाणाने दाखविल्याप्रमाणे Google Drive वर क्लिक करावे. त्यानंतर खालील इमेजमध्ये दाखविल्याप्रमाणे Google Drive ओपन होईल.3. Google Drive ओपन झाल्यानंतर New वर क्लिक करावे . त्यानंतरMore मधील Google Form वर क्लिक करावे. 


                       










4. खालील इमेजमध्ये दाखविल्याप्रमाणे Form Tittle मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा. या ठिकाणी पुस्तक मागणी अहवाल हा विषय घेतलेला आहे.

 




5. खालील इमेजमध्ये दाखविल्याप्रमाणे Form मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुद्याप्रमाणे माहिती edit करावी.इमेजमध्ये बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावे व शेवटी Done वर क्लिक  करावे.


6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते 4 थी पर्यंतच्या वर्गांची माहिती त्यात भरावी.
वरील इमेजमध्ये दाखविल्याप्रमाणे बाणाने
दाखववलेल्या काही ठिकाणी  बदल करावेत व शेवटी Send form वर क्लिक करावे.




7. Send Form वर क्लिक केल्यानंतर खालील
विंडो ओपन होईल. Link to Share या खाली आपल्या गुगल फॉर्म ची लिंक तयार होईल. ती Copy करुन ठेवावी. त्यानंतर Done वर  क्लिक करावे.





8. त्यानंतर खालील इमेजमध्ये दाखविल्याप्रमाणे आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती  इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, whatsapp , फेसबुक, email ने इतरांकडे पाठवू शकतो. इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा
झालेली माहिती  आपणास संकलन होवून Excel फॉरमॅट मध्ये मिळते.


9. खाली दाखववलेल्या Insert Tab चा वापर करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक  डिझाईन करु शकतो.



  अशा प्रकारे गुगल फॉर्म ने माहिती जलदरीतीने गोळा करुन त्याचे संकलन केल्यास आपले कार्यालयीन बहुतेक कामे जलद होतील व पेपरलेस होतील व मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होवून पर्यावर्णाची हानी टाळता येईल.


निर्मिती- श्री.सचिन गायकवाड, जि.प.प्राथ.शाळा घोरपडवाडी ता.राहुरी.












No comments:

Post a Comment